एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यांना कोणीतरी चाहता भेटला. तो म्हणाला की "माझी फक्त दोन व्यक्तिंवर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटो समोर तुमचाही फोटो ठेवलाय."
तर पु.लं. म्हणाले "अहो, असं काही करु नका नाहीतर लोक विचारतील, ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणवून घेतले तो रेडा हाच का म्हणून ?"
