जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे
...
आणि ............
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे.
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास उद्या कर..
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण घरी उशिरा येतो आणि वडील बोलतात
बाळा उशीर होणार होता तर एखादा फोन तरी करायचा?
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर बोलत असतो
आणि वहिनी बोलतात ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही?
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग बघते कोण तुझ काम करेल ते?
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊ जवळ येवून बोलतो... हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊ..
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा फाेन येतो आणि तो बोलतो काय रे मेलास कि जिवंत आहेस अजून?
हे खरं प्रेम...
...
.....
खरंच, तुमच्या जीवनात हे क्षण वाया घालवू नका.
प्रेम म्हणजे फक्त एक मुलगा आणि एक मुलगी नसते.
प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ असतं नेहमी, पण समजायला थोडा उशीर होतो आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये आसवांचा ओलावा..
पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण' असतं,
परत पहावसं वाटणं हा 'मोह' असतो...
त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही 'ओढ' असते,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा 'अनुभव' असतो..
पण त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं!
मला आवडलेली छानसी छोटिसी लव्हस्टोरी...
७-८ वर्षाचे मुलगा मुलगी खेळत होते..
मुलगी:- मी लपते जर तु मला शोधल तर मोठे झाल्यावर आपण लग्न करायचं.
मुलगा:- आणी जर नाही शोधु शकलो तर?
मुलगी निरागसपणे, ए वेड्या प्लिज असं नको रे बोलु..
मी त्या दरवाज्याचा मागे लपेन...
प्रेमाचा अर्थ...
सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते, ते प्रेम आहे.
मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो, ते प्रेम आहे.
भांडून सुधा ज्याचा राग येत नाही, ते प्रेम आहे.
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते, ते प्रेम आहे.
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते, ते प्रेम आहे.
स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो, ते प्रेम आहे.
ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही, ते प्रेम आहे.
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई-बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते, ते प्रेम आहे.
ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते, ते प्रेम आहे.
हे वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली, ते प्रेम आहे.
येशिल का सखे तु दवबिंदु सांडताना..
हा विरह सोसवेना हि रात्र स्वप्नांचि
परि भासते जणु ति प्रणयात रमताना
का उगि तु बोल ना नयनात पाहताना
येशिल का सखे तु दवबिंदु सांडताना..
सोड हा अबोला सांगतो निसर्ग सारा
मनि भाव दाटुनि यावे तुझेच गीत गाता
नेत्र सुखावले असे कोमल योवनात या
येशिल का सखे तु दवबिंदु सांडताना..
तेच हे तराणे नवे तेच लाजणे असे
खळी पड्ताच गाली हास्य तुझे खुले
भावनात गुंतावे सर्वस्वी त्याग हा असा
येशिल का सखे तु दवबिंदु सांडताना..
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....
अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....
अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर्ग हि फिका पडेल तेव्हा......
गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती,
करणा नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहित कशी असेल ती?
एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती,
संसार कसा सांभाळेल ती,
काय माहित कशी असेल ती?
फ्याशन करील की संस्कृती पळेल ती,
परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहित कशी असेल ती?
थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,
आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,
दु:खातही न तुटता हसेल का ती ,
काय माहित कशी असेल ती?
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती ...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..
कुणाची तरी हवी असते..
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते
तेव्हाच ते आपल्या जवळ नसते ?
असे म्हणतात कि प्रेम शोधून सापडत नसते
प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरी देखील प्रत्तेक व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते ?
असे म्हणतात कि प्रेमात पडल्यावर सर्व
काही सुंदर असते
तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते..
हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण काही जणांना ते
शोधून हि सापडत नसत..
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना.
तुला स्वप्नातही वाटणार नाही
... इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?
आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे
जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती..?
समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हहवासा वाटतो मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती..
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
...हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं .
तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला,
तुझ्या कुशीत शिरुन रडायला....
आता मन करतच नाही,
तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला,
तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....
आता मन करतच नाही,
तुला वेड होवून शोधायला,
तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला,
तुला पुन्हा परत बोलवायला....
आता मन करतच नाही,
तुझी सोबत मागायला,
तुझ्यात एकरुप व्हायला,
मला तुझ्या डोळ्यात निहाळायला....
आता मन करतच नाही,
तुझ्या स्वप्नात रमायला,
तुझ्या काँलची वेटीँग करायला,
तुझ्याशी मेसेज चँटवर बोलायला.....
आता मन करतच नाही,
मी तुझाच आहे म्हणायला,
तुला माझ्यात समवायला,
तुझ्या ह्रदयात रहायला...
कधी कोण कोणासाठी झुरत का?
मग का तुटतात अचानक नाती.
मग का होतात मने वेगवेगळी
प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का?
कधी इज्जतीची पर्वा न करता,
घर सोडून पळतात.
कधी इज्जतीची पर्वा करत,
प्रेमाचा बळी देतात.
प्रेम हेच सर्व शिकवते का?
कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात.
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात.
प्रेम इतके निष्टुर असते का?
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत.
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का?
ह्या जगात खरच प्रेम असते का...
मिठीत यायचं तर अशी ये
की दुजेपणाच भान सुटावं
सुप्त मनाच्या वादळातुन
फक्त श्वासांचं रान उठावं
मिठीत यायचं तर अशी ये
की मनानं मनात विरून जावं
माझ्या श्वासाने जरा थांबुन
तुझ्या श्वासात जगुनं घ्यावं
मिठीत यायचं तर अशी ये
की अस्तित्वानं दडून जावं
नेणिवेच्या धुक्यावरती
जाणिवेनं पडून रहावं
मिठीत यायचं तर अशी ये
की क्षणांनी स्तब्ध व्हावं
खोल मनाच्या गाभा-यातुन
आत्म्यानं मुक्त हुंकारावं !!
तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला,
तुझ्या कुशीत शिरुन रडायला....
आता मन करतच नाही,
तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला,
तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....
आता मन करतच नाही,
तुला वेड होवून शोधायला,
तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला,
तुला पुन्हा परत बोलवायला....
आता मन करतच नाही,
तुझी सोबत मागायला,
तुझ्यात एकरुप व्हायला,
मला तुझ्या डोळ्यात निहाळायला....
आता मन करतच नाही,
तुझ्या स्वप्नात रमायला,
तुझ्या काँलची वेटीँग करायला,
तुझ्याशी मेसेज चँटवर बोलायला.....
आता मन करतच नाही,
मी तुझाच आहे म्हणायला,
तुला माझ्यात समवायला,
तुझ्या ह्रदयात रहायला...
जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती..?
समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हहवासा वाटतो मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती..
फक्त त्यातील काही क्षण दे ..........
आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी
यायला वाव दे...
माझ्या स्वप्नातल्या गावात आपल एक घर होत
आणि ते तूच सजवलस,
आज माझ्या स्वप्नातलं गाव तसच आहे,
त्यातल घरही तसच आहे
पण .... पण...
फक्त नाहीस ती तू, तुझी आठवणच फक्त माझी उरली आहे.....
त्या आठवणीतच तू माझी आहेस ....
आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या वेशीवर
कारण त्या घराची राणी फक्त तू आहेस ......
