वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

Showing posts with label joke. Show all posts
Showing posts with label joke. Show all posts

सायन्स कितीही पुढे जाऊंद्या..... एका रोगावर मात्र, कधीच इलाज नाय सापडणार...
...
.....
कसतरी होतय..!

शेअर करा ...

जगातील सर्वात निरागस चेहरे...
१. झोपलेलं बाळ...

२. आईवडिलांसमोर बसलेला आपला मित्र...

३. सुट्टीसाठी अर्ज करणारा.. आणि..

४. मित्रांबरोबर पार्टी करून आलेला नवरा.

शेअर करा ...

आजकालची मुलं नशीबवान आहेत. ती गाणं म्हणत टिव्ही बघत मजा करतात. आमचं लहानपण घरावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं.. गेल्या का मुंग्या...?

शेअर करा ...

पत्नी: मी तुम्हाला व्हॅलेंटाइन गिफ्ट काय देऊ?

पती: प्रेमाने पहा, नम्रतेने बोल, आदर ठेव बाssssस!

पत्नी: नको बाई! मी आपली गिफ्टच देईन.

शेअर करा ...

वाॅटस्अॅप मेसेज म्हणजे...

लग्नात मिळालेली साडी...

एका कडुन दुसर्याकडे पाठवली जाते......

कधीकधी उघडुन न बघताच पुढे ढकलली जाते....

आणी कधीकधी फिरून फिरून परत आपल्या कडेच येते......

शेअर करा ...

पुणेरी अपमान...
जावई - तुमच्या मुलीमधे बरेच दोष आहेत.
सासू - हो ना...! म्हणूनच तर चांगलं स्थळ नाही मिळालं.

शेअर करा ...

जुने लोखंड विका ... पत्र्याचे डब्बे विका ...
तुटकी चप्पल विका ... पेपरची रद्दी विका ...
आणि त्या पैशाचे रिचार्ज करून दोन चार मेसेज करायला शिका ...
...
....
नाही तर मोबाईल विका....
जीवनात खूप हसा, पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा..

शेअर करा ...

दोन वेडे एकमेकांना फोन करतात..
पहिला वेडा: हेलो मी बोलतोय.
...
....
दूसरा वेडा: काय योगायोग आहे. इकडे पण मीच बोलतोय...

शेअर करा ...

पुढारी (डाँक्टराना ) : माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला
समजेल अशा भाषेत सांगा.!

डाँक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे..

फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत..

ऊजवी कडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे..

चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे. त्यामुळे,

रक्तवाहिन्यां मध्ये रास्तारोको आंदोलन चालू झालेले आहे..

मज्जासंस्था सुध्दा आपला पाठींबा काढून घेण्याच्या मार्गावर आहेत..

या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्ष श्रेष्टिंवर पडत आहे. त्यामुळे, ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत.

शेअर करा ...

शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं

सकाळी सकाळी सासू म्हणाली म्हशीला खायला घाल

सून गोठ्यात गेली, म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली..

सासूने विचारलं, म्हशीला चारा टाकला का?
...
....
सून म्हणाली, ती आजुन ब्रश करतेय...

शेअर करा ...

मास्तर: काय रे पप्या & गण्या आज उशीर का झाला तुम्हाला..?

गण्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..

मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??

पप्या: गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो...
...
....
खुप धुतले राव मास्तरने...

शेअर करा ...

आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती...
आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो......
बायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती....

शेवटी मी म्हटल ... अगं ती डाळ जळेल....

ती फटकन् म्हणाली...  जळू देत जळली तर... पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही ...

शेअर करा ...

वैवाहिक जीवनासाठी....

किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.

पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल. त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.

तर तो प्रश्न होता की.....
" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? ”

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते, तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.

तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.

चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."

सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर
योद्धा अशी होती.

तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.

आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.

पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले. लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.

तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की....

" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो "

हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.

शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.

विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.

धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?

त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.

आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात
राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.

यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल. पण रात्री एकांतात काय ?

अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?

आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?

तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.

कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा. माझी कसलीही हरकत राहणार नाही.

हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन. कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
.
.
.
.
तात्पर्य:
बायकोला मनाप्रमाणे वागू द्या, नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे!

शेअर करा ...

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला ,        पेपरची पहीलीच हेडिंग.. स्वाईन फ्लू चे ८ बळी!

लगेच बायकोने हाक मारली, अहो ऐकलंत का........? हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......
त्याने म्हणे ८ बळी घेतले.....
...
.....
नवर्‍याने क्रिकेट बघणे सोडून दिले आहे...

शेअर करा ...

मास्तर: गोट्या सांग, या ग्रुप वर इतके सदस्य आहेत तर ४/५ लोकच मेसेज टाकतात. कारण काय?
गोट्या: शाळेत फक्त २/३ मुले हुशार असतात, सगळी शाळा थोडीच हुशार असते.

शेअर करा ...

एक म्हातारे आजोबा आजारी पडल्यामुळे बेडवर पडून होते. नीट डोळेपण उघडता येत नव्हते.. गावातल्या बायका त्यांना बघायला आल्या.

आजोबांची बायको म्हणाली, 'अहो, कोण-कोण आलय बघा ओळखता येतय का..?'

आजोबांनी कष्टाने डोळे उघडले, बायांकडं बघितलं आणि बायकोकडं बघून मनातल्या मनात म्हणाले,
...
.....
'भर जवानीत यांच्याकडं बघू दिलं नाही, आणि आता मरायची वेळ आली तेंव्हा सांगते, बघा कोण आलय!
उचल रे देवा पटकन..!'

शेअर करा ...

एक दारुडा झूलत झूलत घरी चालला होता..
अचानक मध्येच थांबला..त्याचं काय झालं ...
त्याच्या मागे-मागे दोन मुली आपआपसात कोणत्या तरी कारणावरुन भांडत होत्या..

पहिली मुलगी: देव करो अन तुझ लग्न या बेवड्याशी होवो ...?
दूसरी मुलगी: नाही..देव करो अन तुझंच लग्न होवो..??
...
.....
दारुडा- मी कसं करु..? थांबू का जाऊ?

शेअर करा ...

स्थळ: शाळेचा वर्ग व इंग्रजीचा तास.

मास्तर:  गण्या सांग, Shall कधी वापरतात?
गण्या:  थंडीत
....
.....
मास्तर थंडीने कुडकुडून मेला.

शेअर करा ...

नवरा बायको रस्त्याने चालले होते. समोरुन गाढव येत होते.
बायको(हसून): आहो तुमचे पाहुणेे आलेत नमस्कार करा की.
नवराः नमस्कार सासरेबुवा.
...
.....
बायको कोमात नवरा जोमात नादच खुळा...!

शेअर करा ...

वागता येईल तेवढे सर्वांशी प्रेमाने वागावं, मरायला तर सगळेच आलेत....!! पण जगावं असं कि मेल्यानंतरही नाव निघावं......!!

जीवनाचे खरे मोल मेल्यावरच समजते......
उदाहरणार्थ....
....
.....
जिवंत कोंबडी - ८० रुपये आणि चिकन तंदूरी - ३५० रुपये.

शेअर करा ...