वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

Showing posts with label poem. Show all posts
Showing posts with label poem. Show all posts

संसार म्हणजे चालायचचं !!

घर कितीही आवरलं
तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की
दुध उतू जायचंच
संसार म्हणजे चालायचचं.

रविवारी एखाद्या खूष होऊन
हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र
चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचचं.

पोरांसाठी सगळं करतो म्हणलं
तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की
पांघरूण घालताना कुरवाळायचं
संसार म्हणजे चालायचचं.

बाहेर कितीही चेष्टा केली तरी
तू मला आणि मीच तुला ओळखयाच.
शॉपिंग ला गेल्यावर,
दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

धावपळ करून का होईना
चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून 
आई-बाबांनाच आठवायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

जरा एका जागी स्थिरावलं की
पुढे जायला बस्तान हलवायचं.
आधीचं सोडून चूक तर नाही न केली
हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

छोट्या छोट्या गोष्टींवरून
तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून
एकत्र  होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

शेअर करा ...

मामाचं पत्र हरवलंय की
पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !

कोंबड्याचं आरवण थांबलंय की
ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !

पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय
की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !

मऊ वरण-भात करपलाय
की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !

संवाद कमी झालाय
की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय

आमचं वय वाढलंय
की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय

शुभं करोति म्हणायचं विसरलोय
की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !

रामाची गोष्ट संपली आहे
की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?

एक काहीतरी नक्कीच संपलय !!

शेअर करा ...

'पाणी' शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते 'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या 'पाणी' सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी' भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी' जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी 'पाणी' काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी' पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी' दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी' पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे 'पाणी' होते
ओंजळीतूनी 'पाणी' सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी' करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे 'पाणी..पाणी' करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहर्या‍वरती उठे तरंग

शेअर करा ...

जन्मोजन्मीचं वैर काढत..
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,
देव स्वर्गात बांधत असतो.

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं,

त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.

तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.

आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो.
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.

- व. पु.

शेअर करा ...

लग्नाच्या आधी तुझ्यासाठी झुरतो,
लग्नाच्या नंतर मागपुढं फिरतो,
दिलेली कामं बरोबर करतो,
झुरतो, फिरतो, फिरतो, करतो,
शांत रहा बाई, तू शांत रहा बाई॥

काही दिवस जातात बरे,
तू म्हणतेस तेच खरे,
तुझ्या मनाने सगळेच ठरे,
बरे ,खरे खरे, बरे खरे बरे ,बरे खरे
शांत रहा बाई, तू शांत रहा बाई॥

घरात असते तुझी वटवट,
बाहेर असते किती कटकट,
यामुळे माझी होतेय फरफट,
वटवट, कटकट,कटकट, वटवट,.
शांत रहा बाई, तू शांत रहा बाई॥

खुशीत असल्यावर असतेस जोमात
नाराज झाल्यावर जातेस कोमात
काय असते ते सांग तुझ्या मनात
जोमात कोमात कोमात जोमात जोमात मनात
शांत रहा बाई, तू शांत रहा बाई॥

कवी - बिचारा नवरा

शेअर करा ...

घरटे उडते वादळात, बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज  ?

हात नाहीत सुगरणीला फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ? असा विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात ?

कास्तकाराची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ

शेअर करा ...

नातं.....!!!!!
नातं मनापासून असेल....तर टिकतं...
नातं सहज स्वीकरलं असेल...तर फुलतं...
दोन धीराच्या शब्दांनी...नातं उमलतं....
विश्वासाच्या आधारावर ...नातं बहरतं...
सहज संवादाने ...नातं सुगंधीत होतं...
मतभेद समजून घेतलें तर...नातं भक्कम होतं...
मनाला मन समजलं की...नातं छान गुंफतं..
दूर असो वा जवळ..खरं नातं अभंग असतं..

शेअर करा ...

डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं,
हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असावं,
मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असावं,
जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं..

शेअर करा ...

आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच  अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण....

शेअर करा ...

नातं.....!!!!!
नातं मनापासून असेल....तर टिकतं...
नातं सहज स्वीकरलं असेल...तर फुलतं...
दोन धीराच्या शब्दांनी...नातं उमलतं....
विश्वासाच्या आधारावर ...नातं बहरतं...
सहज संवादाने ...नातं सुगंधीत होतं...
मतभेद समजून घेतलें तर...नातं भक्कम होतं...
मनाला मन समजलं की...नातं छान गुंफतं..
दूर असो वा जवळ... खरं नातं अभंग असतं...

शेअर करा ...

बशी म्हणाली कपाला, श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर अन म्हणतांना म्हणतात कपभर...!

कप म्हणाला बशीला, तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला अन् तुला लावतात ओठाला
...
....
या चहा प्यायला...

शेअर करा ...

क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते..

कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो,
जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो..

फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे, यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात..

शेअर करा ...

तुलना...

काय गंमत पण आहे बोलण्यात आपण
"शब्द" किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या
"स्थाना"वरून निश्चित ठरवतो.

नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला
"खड्डा" म्हणून हिणवतो,
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला
"खळी" म्हणून खुलवतो.

भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला
"डाग" म्हणून डावलतो,
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला
"तीळ" म्हणून गोंजारतो.

तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला
"जटा" म्हणून हेटाळतो,
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला
"बटा" म्हणून सरकवतो.

असच असतं आयुष्यात आपलेही
"सोबती"नेच आपण तसे घडतो,
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो
"योग्य" सोबतीनेच अधिक बहरतो.

शेअर करा ...

सुनबाई, आज आहे माझी एकादशी
काहीबाही खायला देशिल नाहीतर फटदिशी.

तुमच्या भाषेत सांगायचं तर आज माझा आहे फास्ट,
लंच डिनर घेणार नाही, नाही करणार ब्रेकफास्ट.

मसाल्याचं दूध कर केशर वेलची घालून,
बदाम काजू थोडे लाव त्यावर वाटून.

वर घाल त्याच्या जाडसर मलई,
साधं दूध मला बिल्कूल आवडत नाही.

फराळासाठी काही साधंसच कर,
फळं चार कापून दे त्याच्या नंतर.

सुंठ साखर घाल जरा तुपात भिजत,
सुरणाचा कीस ठेव मंद-मंद शिजत.

दाणे घे भाजून आणि जिरं -मिरची वाटून,
मिक्सर नको लावू खलबत्यात घे कूटून.

नैवेद्याला कर खमंग शिंगाड्याचे लाडू,
रताळ्याच्या फोडीसोबत तेही पानात वाढू.

साबूदाण्याच्या वड्या नंतर पॅटीस थोडे कर,
ओल्या नारळासोबत त्यात काजू बेदाणे भर.

शेंगदाणे जपून वापर नाहीतर वाढतं माझं पित्त,
देवाचं नांव घ्यायला असावं चित्त.

राजगिर्याच्या पुर्यासोबत बटाट्याची भाजी,
दाण्यांच्या आमटीसोबत वर्याची सोजी.

काकडीची कोशिंबीर आणि चटणी थोडी कर,
आजच्या दिवस हात जरा चालव भरभर.

दोन जीवांची आहेस स्वतःला जप.
उपवास झेपणार नाही तुला जाईल जड,

माझं काय आता सारे झाले आहे
उपवास मी करीन,  तु पाया मलाच पड.

झाले गेले सारे शांत झाला एकदाचा पोटोबा ,
दर्शन देऊन येते, विटेवर ताटकळतोय केंव्हाचा विठोबा.

शेअर करा ...

जीवन आहे एक रम्य पहाट,
संकटांनी गजबजलेली एक वादळवाट,

सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,

प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गबुंफलेली कविता,

जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव..

शेअर करा ...

बायको माहेरी जाईना..

गेला दसरा गेली दिवाळी
दिवस स्वातंत्र्याचा येईना....
काय करु सांगा मित्रांनो
काही केल्या बायको माहेरी जाईना...

किती सांगितलं दमलीस खूप
आता माहेरी जाऊन आराम कर,जरा.
म्हणते इतकंच असेल, प्रेम माझ्यावर
तर तुम्हीच स्वयंपाक भांडी करा..
अर्थ माझ्या म्हणण्याचा ध्यानात तिच्या येईना....
काय करु सांगा राव बायको माहेरी जाईना....

सारखं लावतोय गाण फिरवून फिरवून
आपण मामाच्या गावाला जाऊया....
मला म्हणते किती छान स्वभाव तुमचा
चला भाचा भाचीला बोलवून घेऊया...
तगमग माझ्या मनाची समजून ती घेइना...
काय करु सांगा तुम्हीच बायको माहेरी जाईना

किती सांगितलं तिला प्रिय भाऊ
तुझी तिथं तुझी वाट पाहत असेल..
काळजी नका करु म्हणते मला तुम्ही
सकाळी तो पहिल्याच गाडीला बसेल..
फारच हट्टी ती समजून काही घेईना

मगाशी बसवली कशी तरी गाडीत
तिला अशी लावून लाडीगोडी...
पण फारच प्रेम माझ्यावर तिचे
बघा मारली चालू गाडीतून उडी ...
मित्रां बरोबर पार्टी करण्याचा योग काही येईना...
काय करु बायको माहेरी जाईना...

शेअर करा ...

शांताबाई हे गाणे ऐकूण बायकोवर लिहिलिले, जन सामान्याना भावणारे हे अफलातून गीत..
"शांत रहा बाई"

लग्नाच्या आधी तुझ्यासाठी झुरतो,
लग्नाच्या नंतर मागपुढं फिरतो,
दिलेली कामं बरोबर करतो,
झुरतो, फिरतो, फिरतो, करतो,
शांत रहा बाई,
तू शांत रहा बाई॥ धृ ll

काही दिवस जातात बरे,
तू म्हणतेस तेच खरे,
तुझ्या मनाने सगळेच ठरे,
बरे ,खरे खरे, बरे खरे बरे ,बरे खरे
शांत रहा बाई,
तू शांत -हा बाई॥ धृ ll

घरात असते तुझी वटवट,
बाहेर असते किती कटकट,
यामुळे माझी होतेय फरफट,
वटवट, कटकट,कटकट, वटवट,.
शांत रहा बाई,
आता शांत -हा बाई॥ धृ ll

खुशीत असल्यावर असतेस जोमात
नाराज झाल्यावर जातेस कोमात
काय असते ते सांग तुझ्या मनात
जोमात कोमात कोमात जोमात जोमात मनात
शांत रहा बाई,
आता शांत -हा बाई॥ धृ ll

.....कवी बिचारा नवरा 😞

शेअर करा ...

नाती तयार होतात हेच खूप आहे.......
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे.......
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही...
एकमेकांची आठवण काढतो आहोत हेच खूप आहे..

शेअर करा ...

आम्ही असे शिकलो...

आयते शर्ट, ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या मागून ठिगळ..
त्यावर करतो तांब्यानी प्रेस,
तयार आमचा शाळेचा ड्रेस..
      
खताची पिशवी, स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी, वाॅटर बॅग..
धोतराचं फडकं, आमचं टिफीन,
खिशात ठेवुन, करतो इन..

करगोटा आमचा असे बेल्ट,
लाकडाची चावी होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार,
हाच आमचा पोषण आहार..
           
रानातला रानमेवा भारी मौज,
अनवाणी पाय आमचे शुज..
काट्यांच रूतणं दगडांची ठेच,
कसा सोडवायचा हा सारा पेच..

मुसळधार पाऊस, पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा, आमचा रेनकोट..
जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची वेगळीच गंमत..

पेन मागता कांडी मिळायची,
गाईड मागण्याची भिती वाटायची..
केस कापण्याची एकच एकच शक्कल,
गप्प बसायचे होईपर्यंत टक्कल..

गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी.....

आजचे शिक्षण: बापाला पुर्ण शिक्षण घ्यायला जितका खर्च आला नाही त्यापेक्षा अधिक खर्च मुलाच्या एका वर्षाच्या नर्सरीला येतो..

शेअर करा ...

नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे.....

कामा वरुन दमून येऊन सुद्धा
अलगत जवळ घेणारा नवरा ....
रुसल्यावर मस्करी करुन 
तुम्हाला हसवणारा नवरा....
भूक लागली असताना सुद्धा
तुम्हाला त्रास नको म्हणून पोट
भरलेले आहे असे फसवणारा नवरा...
नवरा म्हणून आणखी चांगले वागणार कसे..
नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे..

कधीतरी सणाला हळूच
गजरा आणनारा नवरा....
तुम्ही सूंदर दिसत असता तरीही
म्हैस बरी म्हणून तुम्हाला चिडवणारा नवरा....
फार जपतो तो तुम्हाला
पण  नेहमी रागवतो म्हणून वाईट तो नवरा......
तुम्ही दिसत नाही घरात तेव्हा पहा
कसे होतात वेडे पीसे..
नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे...

कधीतरी फार थकुन  सुद्धा
काही बोलत नाही तो नवरा...
तरीही तुमचा आधारचा हात
हातात घेऊन तू आहेस तर आणखी लढेन
असे अबोल पणे बोलून जातो तो नवरा......
त्याच्या गळ्या भोवती रोज लागतात  फासे..
नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे..

तुम्ही जन्म देता कबुल करतो तो नवरा....
पण तुमच्या पेक्षा ही मुलांवर
जीव ओतून टाकतो तो नवरा...
कधी कधी मुलांन पेक्षा ही
लहान समजून तुम्हाला कुशीत घेतो तो नवरा....
कधी कधी जीवाला कंटाळून
तुमच्या मिठीत ढसा ढसा रडून
मन मोकळे करतो तो नवरा....
तुम्ही आहात सोबत तर मी अमीर,
भले रिकामे असोत त्याचे खीसे .....
नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे ..

भाजीत मसाला जास्त झाला
तरी तुमच्या साठी गोड मानून खातो तो नवरा....
एखादा घास कमी खाऊन
तुमच्यासाठी पाणी पिउन राहतो तो नवरा ...
मनात  हजार प्रश्न पण  नेहमी चेहऱ्यावर हसु दिसे
नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे...

शेअर करा ...