वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

सॉलिड फिल्माड रजनीकांतचा एक नवीन प्रोजेक्ट... 'लगान'चा रिमेक. सबकुछ रजनीकांत ईस्टायलमुळे अख्खा सिनेमा अर्थातच सॉलिड टॉलीहीट. नाच गाणी, फायटिंग... या सगळ्यात वर कहर म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स. हा सिनेमा 'लगान'चा रिमेक असल्यामुळे शेवटी क्रिकेटच्या मॅचने होणं अपरिहार्यच. तर शेवटचा सीन सुरू होतो.

सीन : रजनीकांतच्या टीमला जिंकायला दहा रन्सची गरज, उरलाय एक बॉल आणि बॅटिंग करतोय अर्थातच आपला रजनीकांत. (व्हेल्वेटची टाईट लाल पँट आणि फुलाफुलांचा शर्ट, गळ्यात स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल) समोरच्या सुपरहीट ब्रिटीश बॉलरने दोन चार उड्या मारल्या. तोंड चार पाचदा तोंड विचकलं, आठ दहा वेळा बॉल मांडीला घासला...

दहा बारा वेळा उगाच लूक्स दिले आणि रजनिकांतच्या बॅटीवर जॅम जोशात बॉलिंगसाठी स्टार्ट घेतली. आता काय होणार...? अशा परिस्थितीत जिंकणार तरी कसं? थिएटरमधे सगळ्यांचे श्वास वरच्या वर अडकलेले. पण रजनीकांत एकदम कुल. बॉल येताना बघून तो गॉगल काढतो. वर उडवतो आणि तो गॉगल पुन्हा डोळ्यांवर येऊन बसतो. मग बॅट पुढे सरसावून बॉलला असा टोलावतो. की बॉलची दोन शकलं होतात. एकाची जाते सीक्सर आणि दुसर्‍याची जाते फोररन... आणि अशातर्‍हेने रजनीची टीम मॅच जिंकते.

शेअर करा ...