वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

अशिच येशिल तु तेव्हा
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर्ग हि फिका पडेल तेव्हा......

शेअर करा ...