येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात......!
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणि मन स्वच्छ असावं.... शुभ सकाळ!
जगातील सर्वात निरागस चेहरे...
१. झोपलेलं बाळ...
२. आईवडिलांसमोर बसलेला आपला मित्र...
३. सुट्टीसाठी अर्ज करणारा.. आणि..
४. मित्रांबरोबर पार्टी करून आलेला नवरा.
आजकालची मुलं नशीबवान आहेत. ती गाणं म्हणत टिव्ही बघत मजा करतात. आमचं लहानपण घरावर जाऊन अॅटिना सेट करण्यात गेलं.. गेल्या का मुंग्या...?
ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी त्याचा मित्र आहे.
पत्नी: मी तुम्हाला व्हॅलेंटाइन गिफ्ट काय देऊ?
पती: प्रेमाने पहा, नम्रतेने बोल, आदर ठेव बाssssस!
पत्नी: नको बाई! मी आपली गिफ्टच देईन.
वाॅटस्अॅप मेसेज म्हणजे...
लग्नात मिळालेली साडी...
एका कडुन दुसर्याकडे पाठवली जाते......
कधीकधी उघडुन न बघताच पुढे ढकलली जाते....
आणी कधीकधी फिरून फिरून परत आपल्या कडेच येते......
पुणेरी अपमान...
जावई - तुमच्या मुलीमधे बरेच दोष आहेत.
सासू - हो ना...! म्हणूनच तर चांगलं स्थळ नाही मिळालं.
जुने लोखंड विका ... पत्र्याचे डब्बे विका ...
तुटकी चप्पल विका ... पेपरची रद्दी विका ...
आणि त्या पैशाचे रिचार्ज करून दोन चार मेसेज करायला शिका ...
...
....
नाही तर मोबाईल विका....
जीवनात खूप हसा, पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा..
मनाला जिंकायचे असते, "भावनेने"
रागाला जिंकायचे असते, "प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते, "आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते, "धीराने"
संकटाला जिंकायचे असते, "धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते, "माणुसकीने"
आपला दिवस आनंदी जावो!
दोन वेडे एकमेकांना फोन करतात..
पहिला वेडा: हेलो मी बोलतोय.
...
....
दूसरा वेडा: काय योगायोग आहे. इकडे पण मीच बोलतोय...
पुढारी (डाँक्टराना ) : माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला
समजेल अशा भाषेत सांगा.!
डाँक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे..
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत..
ऊजवी कडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे..
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे. त्यामुळे,
रक्तवाहिन्यां मध्ये रास्तारोको आंदोलन चालू झालेले आहे..
मज्जासंस्था सुध्दा आपला पाठींबा काढून घेण्याच्या मार्गावर आहेत..
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्ष श्रेष्टिंवर पडत आहे. त्यामुळे, ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत.
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
...
....
आनंदमयी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा
