व्याख्या...
* पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
* बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
* चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
* ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
* विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.
* कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
* जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
* कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
* कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
* चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह
* अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
* मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
* शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
* सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
* वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
* लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
* फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
* पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
* गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
* लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
* छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
* परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
* परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
* विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
* दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
* थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
* काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
* नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
* घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
* मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
* ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
* विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
* विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
* श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
* श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
* IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
* IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
* बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
* लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना..
