व. पु. काळे '' यांचे विचार....
* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
* वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
*आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
* समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
* संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
* वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
* सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
* चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!
* तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
