एका श्रीमंत माणसाची कार छोटा गरीब मुलगा कुतूहलाने पाहत होता.त्या माणसाने मुलाला गाडीतबसवले आणि फिरवून आणले.
मुलगा - "तुमची कार किती सुंदर आहे! महाग असेल ना?"
श्रीमंत- "हो माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे. मला माहित आहे की तू काय विचार करतोयस, तुलापण अशी कार हवी आहे ना,?"
मुलगा (विचार करून) -"नाही, मला तुमच्या भावासारखे बनायचे आहे..."